पिंपरी / चिंचवड

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या नगर जिल्हा निरीक्षक पदी संतोष जोगदंड

 पिंपरीभारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षक पदी सम्यक विदयार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संतोष जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे. राज्यातील 31 जिल्हा निरीक्षक व संपर्क प्रमुख यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

 

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांनी आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकांना 25 टक्के राखीव कोट्यातुन शाळेमध्ये प्रवेश देण्याबाबत जनजागृती करून महत्व पटवून दिलेले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व परीक्षा फी परताव्यासाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला आहे.

 

संतोष जोगदंड हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत.  सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button