breaking-newsपुणे

सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ

पुणे -राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे तब्बल दीड वर्षांनंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून पुणे विभागातील १६७ अनुदानित महाविद्यालयांमधील सुमारे ४०० प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळणार आहे. नियमानुसार अनुदानित महाविद्यालयांबरोबरच विना अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना सुध्दा संस्थाचालकांनी वाढीव मानधन देणे अपेक्षित आहे. 

राज्याच्या तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणा-या महाविद्यालयांमधील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली होती.त्याच वेळी उच्च शिक्षण संचालनालयाने मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र,त्यात अनेक त्रुटी काढून सुमारे दोन वर्षे मानधन वाढ करण्यास चालढकल केली जात होती.परंतु.एमफुक्टो संघटनेने विविध मागण्यांसाठी कामबंध आंदोलन केल्याने उशिरा का होईना राज्य शासनाने उच्च शिक्षण विभागांतर्गत येणा-या सीएचबीच्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.पुणे विभागांतर्गत येणा-या अहमदनगर ,नाशिक व पुणे जिल्ह्यातील १६७ अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना जुना नियमावलीनुसार सहा महिन्यातून एकदा मानधन दिले जात होते. विभागातील ३८९ प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळत होता. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये विभागातील प्राध्यापकांना १ कोटी २४ लाखांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button