breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याला गंभीर दुखापत; धक्काबुक्कीमुळे घडला प्रकार

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राहुल गांधी यांच्या पासून पोलीस लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान या सगळ्या गदारोळात तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेमार्फत देशभरात काँग्रेसकडून पक्षबांधणी सुरु आहे. राहुल गांधींची ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यापूर्वी तेलंगणामध्ये भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचे नेते सहभागी झाली होते दरम्यान या नेत्यावर एक दुर्दैवी प्रसंग ओढवल आहे.

राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या सोबतच नितीन राऊत यात्रेत चालत होते. भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठवण्यासाठी पोलीस सुद्धा प्रयत्न करत होते. राहुल गांधी यांच्या पासून पोलीस लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान या सगळ्या गदारोळात तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले. नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत (nitin raut) यांना ढकलले तेव्हा तोल जाऊन ते जमिनीवर पडले. यावेळी त्यांचं डोकंसुद्धा जमिनीवर आपटेल म्हणून बचाव कारण्यासाठी नितीन राऊत यांनी त्यांचा हात स्वतःच्या डोक्याखाली धरला. पण तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यालासुद्धा इजा झाली. नितीन राऊत यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. तर भुवईच्या वरचा भाग कापला गेला आहे. मार लागल्याने त्यांच्या डोळा सुद्धा काळानिळा पडला आहे. यानंतर नितीन राऊत यांना उपचारांसाठी हैदराबादच्या बासेरी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, के.सी. वेणुगोपाल, के. राजू यांच्यासह प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात जाऊन नितीन राऊत त्यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनीसुद्धा नितीन राऊत यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. राहुल गांधी यांनी नितीन राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. नितीन राऊत यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा डोळा आणि कानामागील भागात फ्रॅक्चर असल्याचे निदान केले. डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. नितीन राऊत यांनी प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button