breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona: पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ३७ वर!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या एक आठवड्यापासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यत हाती आलेल्या अहवालानुसार आणखी दोन रुग्णांची वाढ झाली असून मंगळवार सायंकाळपर्यंतचा “करोना’बाधितांचा आकडा 37 पर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परंतु चिंतेची बाब म्हणजे “करोना’ने आता दाट लोकवस्तीत शिरण्यास सुरुवात केली आहे

करोना’ने आता दाट लोकवस्तीत शिरण्यास सुरुवात केली आहे. अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या खराळवाडी परिसरात देखील “करोना’चे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, दिघी या भागांसोबतच दाट लोकवस्ती असलेल्या भोसरी, मोशी, चिखली, कासारवाडी, दापोडी, थेरगाव या दाट लोकवस्तीत “करोना’चे रुग्ण आढळले आहेत. तसेच मंगळवारी सायंकाळी चाचणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आलेले रुग्ण हे खराळवाडी परिसरातील आहेत. दाट लोकवस्तीत “करोना’ शिरल्याने नागरिकांना आता विशेष सतर्क राहण्याची गरज आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 37 झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी रात्री उशीरा दोन रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे. त्यातील 23 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तर तीन रुग्णांवर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरात 2 ते 4 एप्रिल या तीन दिवसांत तब्बल आठ रुग्ण आढळले होते. त्यानंतर तीन दिवस शहरात पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला होता. मात्र 8 एप्रिलला पुन्हा दिल्ली येथून आलेल्यांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट’मधील एकाला करोनाची लागण झाली. त्यानंतर सातत्याने शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. 8 ते 13 एप्रिल या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये शहरात नव्या अकरा रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच हे नव्याने सापडलेले रुग्ण शहरातील दाट वस्तीतमधील असल्याने चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान मंगळवारी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये 59 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्राव पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button