breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर चषक शालेय कुस्ती स्पर्धा; फुगेवाडी शाळेचा नकुल भालसिंग विजेता

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर चषक ‘टेन-20’ शालेय कुस्ती स्पर्धेत महापालिकेच्या फुगेवाडी प्राथमिक शाळेचा नकुल भालसिंग याने पालिकेच्याच वैदुवस्ती प्राथमिक शाळेच्या बबलू लोखंडे यांचा पराभव करून 14 वर्षांखालील मुलांच्या 41 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवित सुवर्णपदक जिंकले.


स्पर्धा भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन येथे सुरू आहे. उद्घाटन वस्ताद किसनराव लांडगे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेविका भीमाबाई फुगे, वृषाली लोंढेल, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष पोपटराव फुगे, रतन लांडगे, कालिदास लांडगे आदी उपस्थित होते. विजयी खेळाडूंचे उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी अभिनंदन केले. क्रीडा पर्यवेक्षक अनिल मगर यांनी प्रास्ताविक केले. पप्पू काळभोर यांनी सुत्रसंचालन केले. क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे यांनी आभार मानले.

निकाल पुढीलप्रमाणे…

14 वर्षांखालील मुले :
35 किलोखालील : यश रांजणे (ज्ञान प्रबोधिनी), प्रवण लांडगे (प्रियदर्शनी स्कूल), दिगंबर फाले (सरस्वती विद्यालय).
38 किलोखालील : यश भाकरे (सयाजीनाथ महाराज विद्यायल), शिवा तापकीर (एसपीजी स्कूल), ज्योतिरादित्य मुळे (संत साई स्कूल)
41 किलोखालील : नकुल भालसिंग (फुगेवाडी शाळा), बबलू लोखंडे (वैदूवस्ती शाळा), अथर्व मळेकर (अभिनव विद्यालय).
44 किलोखालील : वेदांत जाधव (आर्मी पब्लिक स्कूल), अर्णव देशमुख (ज्ञान प्रबोधिनी), कानिफनाथ गायकवाड (पिंपळे गुरव शाळा).
48 किलोखालील : कुणाल कस्पटे (विद्यानिकेतन), नील लांडगे (साधू वासवानी स्कूल), समाधान शेलार (पिंपळे गुरव शाळा).
52 किलोखालील : स्वराज काळभोर (सेंट उर्सुला स्कूल), साजीद मुलाणी (ब्लॉसम स्कूल), विश्‍वजित रोकडे (एमएसएस माटे स्कूल),
62 किलोखालील : अनुज यादव (ज्योती स्कूल), रूद्रराज नढे (एमएसएस माटे स्कूल).
68 किलोखालील : संस्कार नेवाळे (पोदार स्कूल), पियुष घेणंद (डी.वाय. पाटील स्कूल), कृष्णा भुजबळ (प्रियदर्शनी स्कूल).
75 किलोखालील : देवराज जाधव (डी. वाय. पाटील स्कूल), पृथ्वीराज नढे (रॉजर स्कूल).
17 वर्षांखालील मुले :
45 किलोखालील : अमित म्हस्के (प्रियदर्शनी स्कूल), सुमीत म्हस्के (प्रियदर्शनी स्कूल), सारंग बोरडे (नागेश्‍वर विद्यालय).
48 किलोखालील : उद्धव कुलथे (ज्ञान प्रबोधिनी).
51 किलोखालील : श्रीराज जाधव (म्हाळसाकांत विद्यालय), ओम कुटे (सेंट उर्सुला स्कूल), विशाल जाधव (थेरगाव शाळा)
55 किलोखालील : संकेत माने (जयभवानी स्कूल), प्रवण सस्ते (नागेश्‍वर स्कूल), समर्थ राऊत (एस.एस. अजमेरा स्कूल)
60 किलोखालील : किरण माने (जयभवानी स्कूल), प्रवण कुटे (सेंट उर्सुला स्कूल), कार्तिक लोखंडे (किलबिल स्कूल).
65 किलोखालील: विशाल कोळी (आर्मी पब्लिक स्कूल), यश नखाते (फत्तेचंद स्कूल), राज निंबाळकर (जैन स्कूल).
80 किलोखालील : रोहित सातपुते (ज्ञानदिप स्कूल), अथर्व बाडे (मीनाताई ठाकरे शाळा).
110 किलोखालील : ऋषिकेश गुराळकर (शिव छत्रपती विद्यालय), प्रतीक जाधव (ज्योती स्कूल), प्रशांत देवरे (क्रीडा प्रबोधिनी).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button