Uncategorized

#War Against Corona: कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी नामवंत डॉक्टरांच्या टास्क फोर्सची स्थापना : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील कोराना-19 विषाणूच्या संसर्गाने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. वाढत जाणाऱ्या मृत्यूदरांचे प्रमाण कमी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी पुण्यातील दहा नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा  टास्क फोर्स (कार्य बल गट) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

       कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला पुण्यातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे हे डॉक्टर पुण्यातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.

पुण्यातील खालील पाच हॉस्पिटल्स कोवीड-19 क्रिटीकल केअर हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

1.      बी.जे.मेडीकल कॉलेज, ससून हॉस्पिटल, पुणे

2.      भारती विद्यापीठ हॉस्पिटल, पुणे

3.      सिम्बॉयसीस हॉस्पिटल,पुणे

4.      नायडू हॉस्पिटल,पुणे

5.      यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड

या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स असतील

डॉ. दिलीप कदम, एसकेएन मेडीकल कॉलेज, नऱ्हे, पुणे

डॉ. शिवा अय्यर, भारती विद्यापीठ, पुणे

डॉ. भारत पुरंदरे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे

डॉ. प्रसाद राजहंस, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे

डॉ. कपील झिरपे, रुबी हॉस्पिटल, पुणे

डॉ. जगदीश हिरेमठ, पुना हॉस्पिटल व रुबी हॉस्पिटल,पुणे

डॉ. अभय सदरे,  बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणे

डॉ. आरती किनीकर,  बी.जे.मेडीकल कॉलेज,पुणे

डॉ. शितल धडफळे, बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणे

डॉ. एस.ए. सांगळे,  बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणे

या टास्क फोर्सबरोबर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग हे समनव्य साधणार आहेत.

डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर  ही टीम देखरेखाही ठेवेल तसेच सल्ला देईल, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button