breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

दिलासादायक बातमी : ‘इन्फ्लुएंझा H3N2’ चा पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या एकही रुग्ण नाही!

एकूण ७ रुग्ण आढळले : एकाचा मृत्यू अन्‌ ६ जण ठणठणीत बरे

पिंपरी : इन्फ्लुएंझा H3N2 या विषाणूचे रुग्ण संख्येत राज्यभरात वाढ होताना दिसून येत आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सदर विषाणूचे रुग्णांची सद्यस्थिती खालील प्रमाणे आहे. दि.०१ जानेवारी २०२३ पासून इन्फ्लुएंझा ए H3N2 बाधित एकुण ०७ रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी ०६ रुग्ण यापुर्वीच बरे झालेले आहेत. सद्यस्थितीत रुग्णालयामध्ये एक ही रुग्ण दाखल नाही.

आजपर्यंत मृत झालेली रुग्ण संख्या- ०१ असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सदर विषाणूमुळे काल दि.१६/०३/२०२३ रोजी ७३ वर्षीय पुरुषाचा कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे मृत्यु झाला. सदर रुग्णास COPD (फुफुसाचा आजार) तसेच Atrial fibrillation, Congestive cardiac failure, Severe mitral regurgitation (हृदयाचे गुंतांगुंतीचे आजार) हे आजार देखील होते.

सदर रुग्णाच्या मृत्युच्या कारणाचे अन्वेषण कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील नेमलेल्या तज्ञ समितीने केले. सदर अन्वेषणाअंती रुग्णाच्या मृत्युचे कारण “Acute Exacerbation of COPD with Atrial fibrillation with Ischemic heart disease (with Low EF off 20%) with hypertension with H3N2 Influenza Positive” असून इन्फ्लुएंझा ए H3N2 ही केवळ Incidental finding (प्रासंगिक कारण) आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी रुग्णालय व कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूचे रुग्णांसाठी प्रत्येकी १० खाटांचे आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आलेला आहे.

इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूस घाबरुन जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. सदर आजारावर औषधोपचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button