breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापूरात विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यावर वाहन जप्त होणार; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

कोल्हापूर – कोल्हापूर पोलीस आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. कोल्हापूरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. अनेक वेळा सांगितल्यानंतर देखील कोल्हापूरकर बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे आता संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई जिल्हा पोलीस दलाकडून सुरू झाली आहे. आता कोल्हापूर पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांची सरळ वाहने जप्त करताना दिसत आहेत.

कोल्हापूरात मंगळवारी दिवसभरात 146 वाहने जप्त करून नियमांचा भंग करणाऱ्या लोकांकडून चार लाखांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. संचारबंदीच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांंपासून पोलिस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्त करत आहेत. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी नाकाबंदीसह गस्तीपथकाद्वारे कारवाई सुरू केली आहे.

शुक्रवारी दिवसभरात शहरातील जुना वाशीनाका, दसरा चौक, बिंदू चौक, फोर्ड कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर अशा शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. विना मास्क फिरणाऱ्यांवर महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येत आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांकडून तब्बल 4 लाख 19 हजार 400 रूपयांचा दंडही वसूल केला गेला आहे.

दरम्यान, कोल्हापूरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्यामुळे आरोग्य व्यवस्था व्हेटींलेटरवर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे पोलीस आपलं काम उत्तमरित्या बजावताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button