breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रावेत येथील इस्कॉन मंदिरात विविध कार्यक्रम

पिंपरी : रावेत येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) येथे दि. १९ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आहे आहे. सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणार्या या कार्यक्रमात भजन प्रवचन कीर्तन, अभिषेक विशेष दर्शन व महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणार सादर होणार आहेत. जन्माष्टमनित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रही आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मंदिरातर्फे चालवल्या जात असलेल्या बालसंस्कार वर्गातील मुले भग्वद्रीतेतील श्लोक पठण कृष्णकथांचे कथाकथन, हृदयांतर हे बोधपर नाटक, कृष्णस्तुतीपर भरतनाट्यम रचनांवर नृत्याविष्कार तसेच भव्य असे धार्मिक पुस्तकाचे प्रदर्शन असे अनेकविध कार्यक्रम होणार आहेत. मंदिरात दिवसभर हरे कृष्णा महामंत्राचे किर्तन सुरु असेल आणि या सर्व वेळात दर्शन खुले राहील, दि. २० रोजी संस्थेचे संस्थापकाचार्य स्वामी ए. सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या १२६ व्या प्रकटदिनानिमित्त आदरांजली कीर्तन महाप्रसाद वितरण तसेच स्वामी प्रभुपाद लिखित सर्व भाषांमध्ये भाषांतरित ग्रंथ खास सवलतीच्या दराने उपलब्ध होतील,

येथे नमूद केलेले सर्व कार्यक्रम मंदिराच्या ‘इस्कॉन रावेत ह्या नावाने फेसबुक युट्युव व इन्स्टाग्राम वर पाहता येतील. त्यासाठी संबंधित संकेतस्थळांचे क्युआर कोड खाली दिले आहेत तरी आपण सर्वांनी आपले कुटुंब व मित्र परिवारासमवेत या महामहोत्सवात सहभागी व्हावे, अशी आग्रहाची विनंती मंदिराचे अध्यक्ष श्रीमान जगदीश गौरांग दास व श्री राधा गोविंद धाम व्यवस्थापन समिती यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button