Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पश्चिम द्रुतगती महामार्गावर नॅशनल पार्क येथील पुलावर बुधवारी डम्परने दुचाकीला जोरदार धडक

मुंबई: पश्चिम द्रुतगती महामार्गावर नॅशनल पार्क येथील पुलावर बुधवारी डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये नाझीर शाह आणि त्यांची पत्नी छाया यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी रस्त्यावर बरेच खड्डे पडले असल्याने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात असताना दोघे डम्परच्या चाकाखाली आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींकडून याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली नॅशनल पार्कसमोर असलेल्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. महामार्गावरच्या या खड्ड्यांमुळंच काल दुपारी दीड-दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बोरीवलीहून दुचाकीनं दहिसरच्या दिशेनं जात असताना एका खड्ड्यात पडून नाझिर आणि त्याची पत्नी छाया हे रस्त्यावर पडले. दुर्दैवानं त्याचवेळी मागून येणाऱ्या डंपरनं त्या दोघांनाही चिरडलं. या दुर्घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला.

नासिर आणि छाया नायगाव येथे शुटिंगसाठी निघाले होते. नासिर हे टीव्हीवरील रिअॅलिटी शोमध्ये क्रिएटिव्ही विभागात काम पाहत होते. तर छाया या मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत होत्या. दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तर, त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे.

पोलिसांनी शाह यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या डम्परसह चालक सलीम शेख याला ताब्यात घेतले आहे. कोणाच्या चुकीमुळे हा अपघात घडला हे चौकशीनंतर पुढे येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. या अपघाताला रस्त्यावरील खड्डे जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button