breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणे

गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा

  • गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३४७ व्या हुतात्मा दिनानिमित्त पत्रकार भवन येथे लायन्स क्लब आणि गुरू तेग बहादूर फुटबॉल फाउंडेशनच्या वतीने गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याला आज ३४७ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांच्या विचारांना प्रेरणा देण्यासाठी ९ ते १८ डिसेंबर दरम्यान पुण्यात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा एस.एस. अहलूवालिया   (अध्यक्ष गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशन पुणे) यांनी पत्रकार परिषदेत केली.

 गुरु श्री तेग बहादूर साहिब यांच्या ३४७ च्या हुतात्मा दिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगण्यात आली. फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण अतिथी लाइन्स सीए अभय शास्त्री, माजी जिल्हा राज्यपाल (2020-2021) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमजेएफ लायन राणी एस.एस.  अहलूवालिया  , सरदार सोना सिंग सोना, सरदार राजिंदर सिंग वालिया (अध्यक्ष पंजाबी कला केंद्र पुणे), लायन शिवकुमार सलुजा, सरदार बलविंदर सिंग राणा, सरदार एल.एस. नारंग, रवींद्र भोसले (अध्यक्ष), विठ्ठल कुटे (सचिव, लायन्स क्लब पुणे कोथरूड) विजय चतुर आणि डॉ. अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुरू तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशन पुणे आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 20 वर्षांपासून गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी या स्पर्धेत महिला संघांसह 60 हून अधिक फुटबॉल संघ सहभागी होतात, या वर्षीही यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रासह अन्य राज्यातील अंध मुलींच्या फुटबॉल संघांचा सामना होणार असून, त्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. या फुटबॉल स्पर्धेसाठी एकूण रु.1.5 लाखांहून अधिक रोख पारितोषिक असणार आहेत.

 फुटबॉल स्पर्धेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही संघांना आमंत्रित केले गेले आहे.  स्पर्धे संबंधी  अधिक माहितीसाठी एसएस  अहलूवालिया   यांच्याशी ९८२२२ ५४५२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button