breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कंगनाविरुद्ध मुंबईत राजद्रोहाचा गुन्हा दाखल

मुंबई – वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत माहिती दिली.

हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट करत असल्याच्या आरोपांप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज दिले होते. त्या आदेशानुसार कंगना व तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. १२४ अ (राजद्रोह) यासह विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलीवूड मधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी अॅड. रवीश जमींदार यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दिली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायाधीश जयदेव घुले यांनी सर्व ट्वीट्स पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता.

आक्षेपार्ह ट्वीटचा तपशील सादर

याचिकाकर्त्याने न्यायालयात कंगनाच्या आक्षेपार्ह ट्वीटचा तपशील सादर केला आहे. पालघरध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केल्यानंतर त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यानंतर मुंबई पालिकेने कंगनाच्या बंगल्यातील अतिक्रमण तोडले असता तिने ‘बाबर सेना’ असा उल्लेख करत ट्वीट केले होते. बॉलीवूडवरही अनेक वादग्रस्त ट्वीटची मालिकाच तिने लावली होती. या सर्वावर बोट ठेवत याचिकाकर्त्याने कारवाई करण्याची मागणी केली होती.

मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर कंगनाने त्यावर ट्वीटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ‘नवरात्रीचं व्रत कोण कोण करतंय? आज नवरात्रीच्या मुहूर्तावर काढलेले माझे फोटो पाहा. मी सुद्धा हे व्रत करत आहे. या सर्वात माझ्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीय. मला जास्त मिस करताय तर मी लवकरच तिथे परतत आहे’, असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button