breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे आजपासून लसीकरण सुरू

मुंबई – कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण खोळंबलं होतं. मात्र, आजपासू ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू झालं आहे. तर, ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण नियमित सुरू राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केलाय. त्याप्रमाणे 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर करता येणार

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

सर्वांना लसीकरण सक्तीचे

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दुसरी लाट सरल्यामुळे लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबविने गरजेचे आहे. तसे प्रयत्न विविध जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, असे असले तरी औरंगाबादकर लसीकरणाविषयी सतर्क आणि जागरुक असल्याचे दिसत नाही. येथे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. याच कारणामुळे औरंगाबाद पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मनपा प्रशासक पांडे हे औरंगाबाद शहरात लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button