breaking-newsराष्ट्रिय
आंध्र प्रदेशसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय, 1 जानेवारीपासून कामकाजाला सुरूवात
आंध्र प्रदेशसाठी वेगळं उच्च न्यायालय स्थापन करण्याचा आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जारी केला आहे. बुधवारी(दि.26) हा आदेश जारी करण्यात आला असून 1 जानेवारी 2019 पासून अमरावती येथून नव्या उच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरूवात होईल.
तेलंगणाच्या निर्मीतीनंतर आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांचे उच्च न्यायालय हैदराबाद येथून कार्यरत होते. नव्या उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे देशातील उच्च न्यायालयांची संख्या 25 झाली आहे.
सध्या उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्या. रमेश रंगनाथन हे नव्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रमुख असतील. नव्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशांव्यतिरिक्त 15 अन्य न्यायाधीश असतील.