पिंपरी / चिंचवड
सोशल मिडियावरून ओळख झालेल्या व्यक्तीचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
पिंपरी l प्रतिनिधी
सोशल मिडियावरून ओळख झालेल्या व्यक्तीने मोशी येथील एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्यचार केला. ही घटना 8 आणि 9 मार्च रोजी मोशी परिसरात घडली.
चाचा नावाच्या 45 वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पिडीत मुलाच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलासोबत आरोपी चाचा नावाच्या व्यक्तीने ब्युड एप आणि व्हाटसएप वरून ओळख केली. 9 मार्च रोजी सकाळी आरोपी फिर्यादी यांच्या पिडीत मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला. तिथे आरोपीने मुलावर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.