पिंपरी / चिंचवड

बिस्कीटाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सीएमईच्या जंगलात बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

बिस्किटाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला सीएमईच्या जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 14) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या कालावधीत घडली.

कुलेश्वर गजाधर ठाकूर (वय 25, रा. बोपखेल. मूळ रा. झारखंड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला आरोपीने बिस्किटांचे आमिष दाखवले. बिस्कीट देण्याच्या बहाण्याने मुलीला सीएमईच्या जंगलात पळवून नेले. तिथे मुलीला मारहाण करून तिच्यावर आरोपीने बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button