ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दर सोमवारी भरणार ‘जनसंवाद सभा’; समन्वय अधिका-यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दर सोमवारी हे अधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करतील. तक्रार निवारणासाठी जास्त अवधीची गरज असल्यास समन्वय अधिकारी नागरिकाला त्याची माहिती देतील. तक्रार विषयक नोंदणी करुन प्रशासक कार्यालयाशी संबंधित तक्रारी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठवतील. तक्रारींविषयी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दर मंगळवारी सकाळी 10 ते 12 मध्ये बैठक आयोजित करण्यात येईल.

नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने सोमवारपासून प्रशासक राजवट सुरु झाली. सर्वच निर्णय प्रक्रिया प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे गेली आहे. महापालिका कार्यकालात प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या घेऊन आयुक्तांची भेट घेत असे. किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे जाऊन नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करत असे.

त्यामुळे नागरिकांनी स्वतः कधीही महापालिकेत येऊन आय़ुक्तांची भेट घेण्याची गरज भासली नाही. मात्र, आता प्रशासक राजवट लागू झाल्याने नागरिकांनी नगरसेवकांकडे आपले म्हणणे मांडता येणार नाही. नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्तांनी शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दर सोमवारी जनसंवाद सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी, प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे. त्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन केले. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालनियाह मुख्य समन्वय अधिका-यांची नेमणूक केली आहे. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय श्रीकांत सवणे, ‘ब’ मकरंद निकम, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय प्रशांत जोशी, ‘ड’ अजय चाकठणकर, ‘इ’ सतिश इंगळे, ‘फ’ उल्हास जगताप, ‘ग’ चंदकांत इंदलकर आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी संजय कुलकर्णी यांची नेमणूक केली आहे.

या अधिका-यांनी दर सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपस्थित राहून जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवावे. या सभेला क्षेत्रीय अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. समन्वय अधिकारी मागील आठवड्यात प्रशासकांनी घेतलेल्या निर्णय, विविध योजना, परिपत्रके याविषयी नागरिकांना माहिती देतील. नागरिकांना दालनामध्ये बोलावून त्यांची तक्रार नोंदवून घेतली जाईल. शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिका-यांशी चर्चा करुन मार्ग काढतील. समन्वय अधिकारी तक्रार नोंदणी व अभिलेख जतनासाठी लघुलेखक किंवा मुख्य लिपिक या सोबत ठेवतील.

तक्रार निवारणासाठी जास्त अवधीची गरज असल्यास समन्वय अधिकारी नागरिकाला त्याची माहिती देतील. तक्रार विषयक नोंदणी करुन प्रशासक कार्यालयाशी संबंधित तक्रारी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठवतील. या तक्रारींविषयी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दर मंगळवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत प्रशासक कार्यालयातील सर्व संबंधित अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत निवारण न झालेल्या, जास्त अवधीशी संबंधित किंवा धोरणात्मक निर्णयांशी संबंधित तक्रारींविषयक बैठक आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे दर शुक्रवारी संबंधित विभागप्रमुखांसोबत आयोजित करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button