breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या अंतर्गत गद्दारांना राजकीय प्रतिष्ठा नको ! राष्ट्रवादीला फितूर

  • निवडणुकीनंतर नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी घेतली शंक
  • महायुतीच्या उमेदवारांचा विजय होणार की परायजय?

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान घेण्यात आले. सर्वांनाच मतमोजणीची उत्सुकता लागलेली असताना चिंचवडमधील भाजपच्या कथीत निष्ठावंतांना मात्र, ‘सरकार आमचेच’ येणार असा अविर्भाव चढल्याचे दिसते. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या विशेषतः महायुतीच्या उमेदवारांचे ज्यांनी काम केले नाही, अशा भाजपमधील अंतर्गत गद्दारांना यापुढे राजकीय प्रतिष्ठा नकोच, अशी पोस्ट चिंचवडमधील स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी स्वतःच्या ‘फेसबुक अकाऊंट’वर अपलोड केली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातच काय तर देशात ‘तोळा मासा’ झालेली भाजप सर्वश्रृत आहे. बोटावर मोजावे एवढ्या चार दोन नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी राज्यात भाजप जिवंत ठेवली. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी तर पालिकेत असलेले सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकटे आंदोलन करताना पाहिले आहे. 2014 च्या विधानसभा मतदार संघात मोदी लाटेला भाळलेल्या आणि सत्तेची लालसा लागलेल्या काही राष्ट्रवादी, कॉंग्रेसमधील आमदार, नगरसेवक, पदाधिका-यांनी भाजपत प्रवेश केला. समोर पर्याय नसल्यामुळे भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वांनीही जोरदार इनकमींग सुरू ठेवले. आज देशात, राज्यात पर्यायाने शहरात ही भाजपची तगडी फौज तयार झाल्याची दिसते.

आज भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती आहे. पालिकेतील मोठमोठी पदं भोगणारे पदाधिकारी हे इतर पक्षातूनच आलेले आहेत. भाजप मोठा पक्ष वाटत असला तरी या पक्षामध्ये आज निष्ठावंत आणि निष्ठेला केराची टोपली दाखविणा-या दोन जमाती तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन काहींनी काम केल्याचा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. किंबहुना निर्माण होत नसला तरी तो व्हावा, याचा प्रयत्न केला जात असावा. ”जसे काही राज्यात 100 टक्के भाजपची सत्ता येणार, त्यात शहरातील महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय होणार, आणि या विजयाचे श्रेय दुस-यांनी लाटण्याअधीच आपण तयार असावे, यातलाच हा प्रकार वाटतो आहे”, अशी भावना भाजपच्याच जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

भाजपमधील गद्दार आणि निष्ठावंत कोण ?

पिंपरी विधानसभा मतदार संघात शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आण्णा बनसोडे यांच्यात लढत झाली. चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहूल कलाटे आणि भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यात लढत झाली. तर भोसरीत भाजपचे आमदार महेश लांडगे आणि अपक्ष माजी आमदार विलास लांडे यांच्यात सामना झाला. या तिन्ही मतदार संघात भाजपची काही गद्दार मंडळी असल्याचे नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या पोस्टवरून स्पष्ट होते. त्यांनी तिन्ही मतदार संघातील अपक्ष किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचेही त्यांना म्हणायचे आहे. राष्ट्रवादीला फितूर झालेल्या भाजपअंतर्गत गद्दारांना यापुढे राजकीय प्रतिष्ठा नको, असे त्यांना सुचवायचे आहे. परंतु, भाजपच्या एका नगरसेवकानेच आपल्याच पक्षात गद्दार आहेत, याची पावती किती योग्य आहे?. आणि गद्दार असतीलच तर त्यांची नावेही त्यांनी जाहीर करावीत, असे मत भाजपच्याच पदाधिका-यांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button