breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंधन दरवाढ ही तर नागरिकांना अच्छे दिनाची बक्षिसी – संजोग वाघेरे पाटील

पेट्रोलवरील दारुचा अधिभार तातडीने कमी करावा – वैशाली काळभोर

पिंपरी – युपीए सरकारच्या कार्यकाळात आंतराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचे दर अनिश्चित असतानाही पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर नियंत्रणात होते. मोदी सरकारने मात्र, देशातील सव्वाशे कोटी जनतेला रोज सकाळी दिवस उगवण्याच्या अगोदरच ‘अच्छे दिनाचे बक्षिस म्हणून पेट्रोल, डिझेलची भाववाढ’ मागील चार वर्षात दिली. चार वर्षापुर्वी देशभर ‘बहुत हुई जनता पर पेट्रोल- डिजल की मार, अबकी बार मोदी सरकार’ अशी देशभर जाहीरात करणारे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान आता मुग गिळून गप्प का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 24) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता दत्ता साने, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका संगिता ताम्हाणे, गीता मंचरकर, निकीता कदम, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, आदी उपस्थित होते. यावेळी मोदी सरकार विरोधात व भाववाढी विरोधात उपस्थितांनी घोषणा दिल्या.

महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या की, युपीए सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरची एक, दोन रुपये भाववाढ झाली तरी डोक्यावर सिलेंडर घेऊन नाचणा-या सुषमा स्वराज आणि स्मृती ईराणी आता गप्प का? आहेत. राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटर परिसरात दारु विक्रीस बंदी केल्यानंतर राज्यातील जनतेवर तीन रुपये प्रति लिटर पेट्रोल दरवाढ लादण्यात आली होती. यानंतर कायद्यात बदल करुन शहरांतील सर्व महामार्गांवर दारु विक्रीस परवानगी देण्यात आली. तरी देखील पेट्रोल वरील दारुचा अधिभार अद्याप रद्द केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सर्वात जास्त दराने पेट्रोल, डिझेल खरेदी करावे लागते. हि दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button