breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

U19 World Cup Final | ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्याची संधी, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप फायनल

U19 World Cup Final | भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी (११ फेब्रुवारी) अंडर-१९ वर्ल्डकपचा अंतिम मुकाबला होणार आहे. सहा महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांचा फायनलमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने जेतेपद मिळवले होते. याच पराभवाचा बदला घेण्याची संधी अंडर-१९ भारतीय संघाला आहे.

भारतीय संघाने २००० मध्ये पहिल्यांदा अंडर-१९ विश्वचषक उंचावला होता. त्यानंतही भारतीय संघाने २००८,२०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरलेय.

आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ११ फेब्रुवारी रोजी बेनोनीच्या विलोमुर पार्कमध्ये रंगणार आहे. भारतीय संघाने नवव्यांदा या स्पर्धेची फायनल गाठली आहे.

हेही वाचा    –    व्हॅलेंटाईन्स डे निमित्त हे जुने चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार! 

भारत अंडर-१९ संघ :

आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र पटेल, सचिन धस, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (यष्टीरक्षक), इननेश महाजन, आराध्या शुक्ला, धनुष गोवडा, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघ :

हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (यष्टीरक्षक), राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ कॉनर, कोरी वॉस्ले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button