breaking-newsमनोरंजन

चित्रपटाच्या कथेची मुळे क्‍यूबन वास्तवात दडलेली – रॉड्रिगो बॅरिसो

पणजी – “अ ट्रान्सलेटर’ हा चित्रपट माझ्या कुटुंबातल्या अत्यंत वैयक्तिक गोष्टीवर आधारीत आहे. चित्रपटाच्या कथेची मुळे क्‍यूबन वास्तवात दडलेली आहेत, असे या चित्रपटाचे यांनी सांगितले. इफ्फी महोत्सवात संध्याकाळी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या चित्रपटाचा स्पर्धात्मक विभागात समावेश आहे.

आपल्या वडिलांच्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. अशा प्रकारच्या कथानकासाठी असा मंच उपलब्ध होणे, हाच एक पुरस्कार असल्याच्या भावना रॉड्रिगो यांनी व्यक्त केल्या. या चित्रपटाला यंदा शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन गॉब्लेट पुरस्कार मिळाला आहे.

इफ्फी महोत्सवात वर्ल्ड पॅनोरमाअंतर्गत दाखवण्यात आलेला “माईने’ चित्रपट मॅथ्यू ब्राऊन यांनी दिग्दर्शित केला आहे. भावनांची गुंतागुंत, अंतर्मुखता, आत्मशोध याबद्दल हा चित्रपट आहे. लोकांशी जोडणारा हा चित्रपट असल्याचे ब्राऊन यांनी सांगितले. विवाहित स्पॅनिश महिलेच्या आत्मशोधाच्या प्रवासाची ही कथा आहे.

तृतीयपंथी सामान्य व्यक्तींसारखेच – लेनीन 
तृतीयपंथीयांविषयीच्या प्रश्नांवर बोलले गेले पाहिजे आणि हा चित्रपट एक प्रयत्न असल्याचे “रुभा’ या द्वैभाषिक चित्रपटाचे दिग्दर्शक लेनीन सीवम यांनी सांगितले. तरुण आशियाई तृतीयपंथी महिला “रुभा’ आणि एक विवाहित पुरुष यांची ही प्रेमकथा आहे. तमिळ लघुकथेतून प्रेरणा घेऊन श्रीलंकेत मुळ असलेल्या कॅनेडिअन दिग्दर्शकाचा हा चित्रपट आहे. तृतीयपंथी सामान्य व्यक्तींसारखेच असतात, असे या चित्रपटात “रुभा’ची भूमिका साकारणाऱ्या अम्रीत संधूने सांगितले. लेनीन सीवम यांनी अनेक लघुपट दिग्दर्शित केले असून “1999′ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button