breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील वाहनचोर ‘सुसाट’

पिंपरी । प्रतिनिधी

शहरातून 4 दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. जवळपास दररोज दुचाकी चोरीची नोंद शहरात होत आहे. सागर सतीश भोसले (वय ३०, रा. यमुनानगर) यांनी फोर्स मोटर्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. वाढत्या चोरीच्या घटना पाहता शहरात वाहनचोर सुसाट असल्याचे चित्र आहे.

पिंपरीतील गणेश अपार्टमेंट जवळून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार रामलाल लुंबाराम चौधरी (वय ३१, संभाजीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिला आहे. सागर सुरेश चाळके (वय ३०, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी राहत्या घरापासून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

ऋषिकेश श्रीधर नाईकडे (वय २२, रा. राधारमण कॉम्पलेक्स, नवी सांगवी) यांची दुचाकी चोरीस गेली होती. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी रोहित राजेश वेर्णेकर (वय २३, रा. दर्शन पार्क, डी. पी. रस्ता, औंध) याला अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button