शरद पवारांच्या प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?; संजय राऊत यांचा सवाल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोन शीर्षस्थ नेत्यांची जवळपास तासभर भेट झाली. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? या मुद्द्यावर वेगवेगळे राजकीय तर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रातील राजकारण, शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चा, स्वतंत्र सहकार खाते आणि राज्यातील सहकार क्षेत्र, राज्यातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अशा अनेक मुद्द्यांचे अंदाज बांधले जात होते. पण, शरद पवारांनी नेमकी कशासाठी पंतप्रधानांची भेट घेतील होती, याविषयी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारण स्पष्ट केले आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला. पवार-मोदींची राजकीय भेट आहे, असं मला वाटत नाही. या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रावर चर्चा झाली असेल. पवार हे देशाचे प्रमुख नेते आहेत. सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पंतप्रधानांना भेटतात तेव्हा तुम्ही त्यात राजकारण का काढता? पवार हे मोदींना भेटत असतात. प्रत्येक भेटीत राजकारण असत नाही, असं त्यांनी सांगितलं.





