‘वर्षा’वरील भितींची रंगोटी; लिहिणाऱ्यांचं तोंड काळं झालंय – संजय राऊतांची टीका

मुंबई |महाईन्यूज|
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील भिंतींवर लिहिलेल्या मजकुरावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या वादात उडी घेतली आहे.
वर्षा बंगल्यातील एका भिंतींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ‘मी हा मजकूर पाहिलेला नाही. मी कधी वर्षा बंगल्यावरही गेलो नाही. काही मजकूर असेल तर तो रंगरंगोटी करून मिटवता येईल. मात्र ज्या लोकांनी असा मजकूर लिहिला आहे, त्यांचं तोंड मात्र आता काळं झालं आहे.’
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप-सेना युतीत मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनावर्षा बंगला सोडावा लागला. आता बंगल्याच्या भिंतीवर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे डर्टी पॉलिटिक्स असल्याचं म्हटलं आहे.





