Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजन

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व्याख्यान व संगीत सभा उत्साहात

पिंपरी चिंचवड । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महीन्याच्या १ तारखेस विज्ञान व्याख्यान व संगीत सभा आयोजित केली जाते. गुरुवार १ सप्टेंबर रोजी सायं. ६.०० वाजता श्री. अरुण सोनार (लिंमगावकर) विभाग प्रमुख इन्स्टुमेंटेशन अभियांत्रिकी विभाग, डॉ.वाय. पाटील इन्स्टिट्यू ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी यांचे पेटंट आणि कॉपीराईट या विषयावर व्याख्यान अयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क तर्फे सुनिल पोटे यांनी व मराठी विज्ञान परिषदे तर्फे राजेंद्र सराफ यांनी केले. जलदिंडीचे श्री. भावसार यानी व्याख्यात्यांचा परीचय उपस्थितांना दिला.

पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्यावतीने सायं. ७.०० वाजता संगीत संध्येचे आयोजन करणेत आले. संगीत संध्या सभेचे संयोजन स्मिता देशमुख यांनी केले. स्वरेशा पोरे- कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी सुरुवातीला राग राजेश्री सादर केला. त्यामध्ये विलंबित एकताल यामध्ये बडाख्याल सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर यमन रागाच्या विविध छटा सादर केल्या आणि पद्मनाथा नारायणा या नाट्यगीताने संगीत संध्येची सांगता केली. त्यांना तबल्यावर सारंग चींचणीकर यांनी उत्तम साथ केली आणि हार्मोनियम वर पियुष कुलकर्णी यांनी साथसंगत केली. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संयोजक प्रवीणजी तुपे यानी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थितांचे आभार मानले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button