Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पुणे, सातारा, नाशिक आणि विदर्भात मध्यम पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे. अशात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मध्यम पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

पुणे, सातारा, नाशिक परिसरातील ढगांची दाटी बघायला मिळाली असून विजांचा कडकडाट होत आहे. पुढील ३-४ तासांत पुणे सातारा नाशिकमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई ठाण्यात काही भागांत ढगाळ वातावरण तर काही भागांत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गडचिरोलीमध्ये धुवांधार पावसाने पूर परिस्थिती…
गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून तब्बल २० मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे भामरागड येथील १५० आणि देसाईगंज येथील हनुमान वॉर्डातील ४३ अशा एकूण १९३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एका मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७५ कच्ची घरे आणि २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button