Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा
एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना
बीड : बीडच्या धारुर तालुक्यातील आसोला येथील एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मोहन चोले यांनी मुलाच्या विरहातून हे टोकाचे पाऊल उचलले असावं असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नेमकं आत्महत्येचे कारण पोलीस तपासात स्पष्ट होईल.” मुलाने आत्महत्या केली तेव्हा वडिल हे पंढरपूर इथे वारीमध्ये गेले होते. त्यांना माहिती मिळताच ते गावी आसोला इथे परत आले. मुलाने आत्महत्या करुन आठ दिवस होत नाहीत तोच गेल्या शुक्रवारी मुलाने तर या शुक्रवारी वडीलानी टोकाचे पाऊल उचलले आहे.




