Uncategorized

गोंदिया जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्याच्या वाटेवर

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटातील इनकमिंग सुरूच आहे. त्यातच आता काँग्रेससह इतर पक्षांनाह बरीच गळती लागल्याचे दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्याच्या वाटेवर असून काँग्रेससग इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या काँग्रेस सह इतर पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली असून अनेक दिग्गज नेते हे विविध पक्षांमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. अशातच अर्जुनी मोरगाव विधानसभेचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी मुंबई येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजेच तिसऱ्या आघाडीकडून सुगत चंद्रिकापुरे यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती. मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेची वाट धरली.

हेही वाचा  :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मिळाला नवा कर्णधार, जाणून घ्या RCB चा संपूर्ण संघ 

एवढंच नव्हे तर आता आमगाव देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना गटामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 20 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार झटका बसणार आहे. शिवसेनेतील इनकमिंग गेल्या काही महिन्यात वाढलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक दिग्गज नेतासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या अजित पवार गटातील नेताही शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याने महायुतीमध्ये कुरबूरी वाढण्याती शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत काँग्रेससह इतर पक्षांनाही गळती लागली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना पक्ष मजबूत होण्याच्या मार्गावर आहे. आता येणाऱ्या 20 तारखेला कोण कोण प्रवेश करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button