ठाणे जिल्ह्यात इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती
ठाणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे गुरुवारी 5 मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगर तहसीलदार (महसूल अधिकारी) कोमल ठाकूर यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
उल्हासनगर कॅम्प 5 येथे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब सकाळी 11.30 च्या सुमारास पडला, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, 30 फ्लॅट असलेली रचना बेकायदेशीर आहे आणि आधीच नोटीस बजावण्यात आली आहे. या इमारतीत अजूनही पाच कुटुंबे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, महसूल आणि महापालिका अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश असून सागर ओछानी (19), प्रिया धनवानी (24), रेणु ढोलंदादास धनवानी (54), धोलदास धनवानी (58), अशी मृतांची नावे आहेत.





