Uncategorized

चिखली प्रभाग १: स्व. दत्ता काका साने यांच्या वारशाला पुढे नेणारा “श्रावण बाळ” विकास साने

मिशन- PCMC : राष्ट्रवादी काँग्रेसचा घरोघरी प्रचार

पिंपरी-चिंचवड : चिखली-मोरेवस्ती परिसरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार सक्षम नेतृत्वांना मैदानात उतरवले आहे. विकास साने, संगीता ताम्हाणे, यश साने आणि साधना काशीद हे उमेदवार नागरिकांसमोर आपली ताकद दाखवत आहेत. पक्षाकडून संघटित नेतृत्वासोबत विकासाभिमुख दृष्टीकोनाचा संदेश दिला जात आहे.

या प्रभागाची ओळख स्व. दत्ता काका साने यांच्या प्रभावी कार्यकाळामुळे भक्कम झाली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर परिसर काही काळ खरोखर पोरका झाला होता, मात्र त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे कार्य विकास साने आणि यश साने यांनी सुरू केले. समाजकार्य, नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि समस्यांवर लढण्याच्या भूमिकेमुळे प्रभागाला “नवीन काका रूपी श्रावण बाळ” मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सामान्यपणे दोन मुलांचे संगोपन करणे हीच मोठी जबाबदारी असताना, विकास साने यांनी *“विकास सोशल फाउंडेशन”*च्या माध्यमातून १०० मुलांचे संगोपन, शिक्षण, नोकरी आणि विवाह यांची जबाबदारी पार पाडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या समाजसेवेने त्यांना प्रभागातील नागरिकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवून दिले आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या भव्य सभेत आमदार गोरखे यांनी मांडले विकास व्हिजन

कोविडच्या काळात विकास साने यांनी घरात बसून राहण्याऐवजी ३० हजार स्क्वेअर फूट जागेत अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिकेने परवानगी नाकारली. तरीही त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्णय घेत निवडणूक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला.

प्रभागातील नागरिकांसाठी २४ तास सेवा, समस्यांचे निराकरण तसेच ५० हजार नागरिकांना काशी व विविध तीर्थक्षेत्र दर्शनाची संधी उपलब्ध करून देणे यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये स्व. दत्ता दादा साने यांच्या नंतर विकास साने हे प्रभागाचे खरे अर्थाने दातृत्व स्वीकारणारे “श्रावण बाळ” ठरत असल्याचे नागरिक खुलेपणाने व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणाऱ्या जनसमर्थनामुळे प्रभागातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार झाली आहे आणि राजकीय वर्तुळात विकास साने यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“नागरिकांची सेवा हीच खरी जबाबदारी आहे; प्रत्येक समस्या सोडवणे आणि प्रत्येक हृदयाशी जोडणे हेच माझे ध्येय आहे.”

– विकास साने, उमदेवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 1.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button