पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या भव्य सभेत आमदार गोरखे यांनी मांडले विकास व्हिजन

मिशन- PCMC : “संत तुकाराम थीम पार्कपासून स्मार्ट सिटी योजना पर्यंत – पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास आमच्या प्राधान्यक्रमात

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकुर्डी येथे भव्य सभा पार पडली, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभेत बोलताना आमदार अमित गोरखे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा पिंपरी-चिंचवडसाठीचा स्पष्ट विकास दृष्टीकोन उपस्थितांसमोर मांडला.

आमदार गोरखे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या पवित्र स्थळी जीवन व विचारांवर आधारित भव्य थीम पार्क उभारण्याचा संकल्प भाजप सरकारने केला आहे. हा प्रकल्प धार्मिक तसेच सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्टीने महत्वाचा ठरेल. त्यांनी पीएमआरडीएचा अन्यायकारक डीपी आराखडा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय फडणवीस सरकारने घेतल्याचे सांगितले. आकुर्डीकरांचा गेली १०–१५ वर्षे प्रलंबित साडेबारा टक्के (१२.५%) परताव्याचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला, ज्यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला.

आमदार गोरखे यांनी शहराच्या विकासासाठी केलेल्या प्रमुख कामांची माहितीही दिली:

1. मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत नेण्याची तरतूद
2. १८० कोटींच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाचा प्रकल्प मंजूर
3. वायसीएम रुग्णालयाला पीजी इन्स्टिट्यूट दर्जा
4. महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांग भवन सुरू
5. दिव्यांगांसाठी २००० रुपये मासिक पेन्शन योजना

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पिंपरीगाव संवेदनशील जाहीर करा : संदीप वाघेरे

महावितरणचे अत्याधुनिक संगणकीय कार्यालय पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व नागरी सुविधांद्वारे शहराचा सर्वांगीण विकास साधल्याचे स्पष्ट केले. पाण्याच्या समस्येबाबत त्यांनी भामा आसखेड प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले, ज्यामुळे लवकरच दीर्घकालीन पाण्याची गरज पूर्ण होईल.

गोरखे यांनी “एक शहर – एक मतदानसंघ” संकल्पनेद्वारे सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा थेट सहभाग हा भाजपचा मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी शिवनेरी जिल्हा व सरकारी कार्यालयांचे विकेंद्रीकरण, एकात्मिक प्रशासकीय केंद्र, स्वतंत्र टास्क फोर्स, स्मार्ट सिटी प्रशासन, स्मार्ट फॅमिली अ‍ॅप, तसेच आरोग्य व स्वच्छतेवर विशेष भर देऊन शहराला आधुनिक आणि सक्षम बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

सभेअखेरीस विरोधकांवर टीका करताना त्यांनी विचारले, “२०१४ पूर्वी एवढा विकास का झाला नाही? आज दिसणारा विकास फडणवीस सरकारच्या धाडसी नेतृत्वामुळेच संभव झाला आहे.” सभेला चिंचवडचे आमदार शंकर शेठ जगताप, भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, विधान परिषद सदस्य उमाताई खापरे,

शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे आणि मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आम्ही फक्त रस्ते आणि इमारती नव्हे, तर पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो. प्रत्येक नागरिकाला विकासाचा लाभ मिळावा, हा आमचा संकल्प आहे.”

– अमित गोरखे, आमदार, विधान परिषद.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button