Uncategorizedताज्या घडामोडी

चिपळूण शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर्स हटवले, चिपळूणसह कोकणात राजकीय घडामोडींना वेग, पोलीस दल सतर्क

रत्नागिरी/चिपळूण : चिपळूण शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर्स शुक्रवारी सकाळपासून झळकले होते. महापुराच्या काळात केलेल्या मदतीबद्दल चिपळूण मधील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मदतीसाठी आभार व्यक्त केले होते. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचे बॅनर शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी लावले होते.पण हे बॅनर्स रात्रीच कोणीतरी काढल्याने खळबळ उडाली आहे. ‘चिपळूणला उभारी देणारे मदतीचे हाथ मा. ना.एकनाथ शिंदे यांची साथ’ असा एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारा मजकूर बॅनरवर होता. त्यामुळे आता या सगळयावरूनयेथील राजकीय वातावरण तापाण्याची चिन्हे आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण, शांततेतच वातावरण आहे या सगळ्याबाबत शनिवारी सकाळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्याकडून ११ वाजता शिवसेनेकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान खेड मध्येही रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे याना साथ देण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. आज खेड शिवसेनेतील रामदास कदम विरोधी गटाचे काही ज्येष्ठ कायकर्ते यांची बैठक होणार असून त्यानंतर ते आपली भूमिका मांडणार आहेत.

चिपळूण शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ व काही पदाधिकाऱ्यांचे फोटो या बॅनरवर लावण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे पोस्टर लावले होते. उमेश सकपाळ हे एकनाथ शिंदे व उदय सामंत यांचे कट्टर समर्थक आहेत. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचेही फ़ोटो या बॅनरवर सर्वात वरच्या स्थानी आहेत. यामुळे शिवसेनेच्या प्रोटोकॉल प्रमाणे हा बॅनर असल्याचे दिसत होते. शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ आणि चिपळूण मधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले हे बॅनर लावले होते.

दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे राजकीय तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरात शांततेच वातावरण आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button