Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीत ५७.७१ टक्के मतदान

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून सुमारे सरासरी ५७.७१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी..

८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते १६.३ टक्के इतके झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २८.१५ टक्के इतके झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४०.५ टक्के मतदान पार पडले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५७.७१ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते.

प्रभागनिहाय मतदान टक्केवारी..

प्रभाग क्र. १ – ६०.६१ टक्के

प्रभाग क्र. २ – ६४.९१ टक्के

प्रभाग क्र. ३ – ६०.९७ टक्के

प्रभाग क्र. ४ – ५७.०८ टक्के

प्रभाग क्र. ५ – ६१.५८ टक्के

प्रभाग क्र. ६ – ५५.७२ टक्के

प्रभाग क्र. ७ – ५८.३७ टक्के

प्रभाग क्र. ८ – ६०.१९ टक्के

प्रभाग क्र. ९ – ५६.९१ टक्के

प्रभाग क्र. १० – ४९.५४ टक्के

प्रभाग क्र. ११ – ५४.७१ टक्के

प्रभाग क्र. १२ – ६५.१४ टक्के

प्रभाग क्र. १३ – ५४.२७ टक्के

प्रभाग क्र. १४ – ५३.४४ टक्के

प्रभाग क्र. १५ – ५५.५६ टक्के

प्रभाग क्र. १६ – ६२.४५ टक्के

प्रभाग क्र. १७ – ६०.०४ टक्के

प्रभाग क्र.  १८ – ५६.१८ टक्के

प्रभाग क्र. १९ – ४९.२२ टक्के

प्रभाग क्र. २० – ५५.४२ टक्के

प्रभाग क्र. २१ – ५६.७६ टक्के

प्रभाग क्र. २२ – ६०.२८ टक्के

प्रभाग क्र. २३ – ६३.३७ टक्के

प्रभाग क्र. २४ – ६१.७२ टक्के

प्रभाग क्र. २५ – ६०.४८ टक्के

प्रभाग क्र. २६ – ५५.३० टक्के

प्रभाग क्र. २७ – ६१.०१ टक्के

प्रभाग क्र. २८ – ५४.८८ टक्के

प्रभाग क्र. २९ – ५४.५९ टक्के

प्रभाग क्र. ३० – ५४.२२ टक्के

प्रभाग क्र. ३१ – ५२.०० टक्के

प्रभाग क्र. ३२ – ५७.५९ टक्के

हेही वाचा –  ‘भारतात सामान्य नागरिक हाच प्रशासनाचा केंद्रबिंदू’; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मत

कंट्रोल रुमद्वारे लक्ष..

मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवन येथे कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू राय आणि निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली.

मतदारांसाठी विविध सोयीसुविधा..

मतदान केंद्रांवर सर्व मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, शौचालयांची सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांसाठीही मतदानाच्या दिवशी विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या त्या मध्ये मतदारांचे मोबाईल जमा करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले होते. यामुळे केंद्रावर मोबाईल घेऊन आलेल्या मतदारांना सुरक्षित मोबाईल जमा करून मतदान करता आले. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर कार्यालयाकडील अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका, महाविद्यालयातील स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व सुविधांमुळे दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्व मतदारांना सुलभ, सुरक्षित व सुरळीतरीत्या मतदानाचा हक्क बजावता आला आहे. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मतदारांसाठी सेल्फी पॉइंट्स..

मतदान जनजागृतीबाबत सुविचार, घोषवाक्ये, आकर्षक छायाचित्रे अशी सजावट करून मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढली. यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी अल मनार प्राथमिक व माध्यमिक शाळा, साई जीवन प्राथमिक विद्यालय, मास्टर माईंड, ग्लोबल इंग्लिश स्कूल यांसह कुदळवाडी, भोसरी आणि चिखली येथील मतदान केंद्रांवर जाऊन सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदारांना सुलभ मतदान करता येत आहे की नाही आणि महापालिकेकडून पुरवण्यात आलेल्या सुविधांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button