Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये 60 % मतदान!

रवी लांडगे,सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याने १२६ नगरसेवकांचे भवितव्य मतपेटीत बंद

आज १० वाजल्यापासून मतमोजणी ; दोन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात सुमारे 60 टक्के मतदान झाले. शहरातील सांगवी, भोसरी आणि चिखली परिसरातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या. पिंपळे गुरव येथे मतदान केंद्रावरील आधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुमरी झाली. चिंचवडमध्ये माजी महापौरांच्या पतींनी मतदान करतानाची फेसबुक पोस्ट केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

शहरात ३२ प्रभागांतून १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मधून भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे, तर प्रभाग १० मधून सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १२६ जागांसाठी सुमारे १७ लाख 13 हजार मतदारांकरिता २ हजार ०६७ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सर्व केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासांत शहरात सगळीकडे ६.५६ टक्के मतदान झाले होते. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेनऊपर्यंत ६ टक्के मतदान झाले.साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत १६ टक्के मतदान झाले होते. तसेच दुपारी दीड वाजेपर्यंत २८.७१ टक्के,i आणि साडेतीनपर्यंत ४०.५ टक्के मतदान झाले होते.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक फंडे वापरले गेले. काही हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवर सवलत होती. काही ठिकाणी रिक्षाचालकांनी प्रवाशांना मोफत सेवा देऊ केली. कॅब सर्व्हिसमध्येही पाच किलोमीटर परिसरात सवलत देऊ करण्यात आली होती. त्याचा लाभ प्रामुख्याने वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांनीही स्वयंस्फूर्तीने मतदान केले. त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर डोली आणि व्हिलचेअर्सची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यक्तींच्या सोबत ओळखीच्या व्यक्तींना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

शहरातील सेलिब्रिटींनीही शूटींगच्या शेडुल्डमधून वेळ काढला आणि मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रियांका यादव, मृण्मयी गोंधळेकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी मतदानाचे कर्तव्य बजावल्याचे समाधान व्यक्त केले.सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय चुरस पिंपरी-चिंचवडमधील चुरस पाहता पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस कुमक आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तासंग्रामासाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शहरातील काही भागांत ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यातच मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास घालण्यात आलेल्या बंदीवरून मतदार आणि निवडणूक अधिकारी यांच्यात अनेक ठिकाणी खटके उडाले, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा –  ‘भारतात सामान्य नागरिक हाच प्रशासनाचा केंद्रबिंदू’; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मत

वादावादी आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रकार

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच प्रभाग क्रमांक १८ मध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप झाला आहे. भाजपच्या उमेदवार अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ आणि फोटो थेट फेसबुकवर अपलोड केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
सर्वसामान्य मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही निलेश डोके यांनी मोबाईल मतदान केंद्रात नेला. लोकशाहीचा कणा असलेली मतदान प्रक्रिया ही गुप्त आणि निर्भय असणे अपेक्षित असताना, भाजप उमेदवाराच्या पतीकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

यंत्रणेच्या बिघाडामुळे मतदारांन मनस्ताप

शहरातील सांगवी, भोसरी आणि चिखली परिसरातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या. सकाळी लवकर मतदान करून कामावर जाण्याच्या तयारीत असलेल्या नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसला. काही केंद्रांवर तब्बल पाऊण ते एक तास मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. निवडणूक प्रशासनाने तातडीने ‘बॅकअप’ मशिन्स तैनात केल्या असल्या, तरी या गोंधळामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नागरिकांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोबाइलवरून यावेळेही गोंधळ

मोबाईल बंदीवरून केंद्रांवर गोंधळ या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात आणि केंद्राच्या आत मोबाईल नेण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. मात्र, अनेक मतदारांना या नियमाची पूर्वकल्पना नसल्याने किंवा डिजिटल ओळखपत्रासाठी मोबाईल सोबत ठेवल्याने गोंधळ उडाला. “मोबाईल कुठे ठेवायचा?” यावरून केंद्रावरील सुरक्षा रक्षक आणि मतदारांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. अनेक मतदारांनी संताप व्यक्त करत, प्रशासनाने मोबाईल ठेवण्याची पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, असे मत मांडले.

असे होते यंत्रणेचे स्वरूप

मतदान केंद्रे: २०६७
नावीन्यपूर्ण मतदान केंद्र: ०८
महिला कर्मचारी संचलित: ०८
संवेदनशील मतदान केंद्र :४८९
सर्वाधिक केंद्रे(प्रभाग क्र. १६):९७
सर्वांत कमी केंद्रे(प्रभाग क्र. २३:३९

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button