Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय महिला संघ जाहीर

Women’s T20 World Cup 2026 | महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे १४ जून ते ५ जुलैदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार असून स्मृती मानधना उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

२०२५ मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे विश्वचषक जिंकत ऐतिहासिक यश मिळवले होते. त्यानंतर आता टी-२० विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य संघासमोर आहे. अनेकदा अंतिम टप्प्यात अपयश आल्याने यंदा जेतेपद मिळवण्याचा निर्धार संघाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा 

तुमच्या फोनवरही ‘Emergency Alert’चा मेसेज आला? जाणून घ्या याचा नेमका अर्थ 

संघरचनेत यस्तिका भाटियाच्या पुनरागमनामुळे तिला यष्टीरक्षक आणि फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत संधी देण्यात आली आहे. प्रतिका रावलच्या जागी तिची निवड करण्यात आली आहे. सलामीला स्मृती मानधना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरणार असून मधल्या फळीत जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष आणि भारती फुलमाली यांच्यावर धावांची जबाबदारी असेल.

दरम्यान, अष्टपैलू खेळाडू आणि २०२५ च्या वनडे विश्वचषकातील महत्त्वाची मॅचविनर ठरलेली अमनजोत कौर दुखापतीमुळे संघाबाहेर राहिल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), श्री चरणी, नंदिनी शर्मा, अरूंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button