पंतप्रधान मोदींनी दिल्या इंदापूरमधील नवदाम्पत्याला शुभेच्छा
पंतप्रधान मोदींना इंदापूरमधील नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा पाठवून सुखद धक्काच दिला आहे. नानासाहेब धनवडे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मुलाच्या लग्नाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्याने इंदापुरात राहणाऱ्या या शेतकरी कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील सराफवाडीत राहणाऱ्या संदीप धनवडे- पाटील परिवाराला विवाहाच्या निमित्ताने मोदींनी शुभेच्छा देत, पुढील आयुष्य सुखी व समृद्ध जावे, असे म्हटले आहे. दीपक आणि वैभवी यांच्या विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. तुमच्या कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणी मला बोलवले त्याबद्दल धन्यवाद. नवजीवनाच्या वर-वधूस मनापासून शुभेच्छा, असे मोदींनी पत्रात म्हटले आहे.
हा विवाह तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी तसेच विश्वास आणि मैत्रीचा धागा दोघांना सदैव बांधून ठेवेल. तुमच्या नात्यामध्ये स्नेह राहील. जीवनाच्या प्रवासात ते नाते अधिक घट्ट आणि मजबूत व्हावे, सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, असेही पत्रात म्हटले आहे.





