Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedमहाराष्ट्र

‘अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे’, निलेश राणेंचा सरनाईकांवर निशाणा

मुंबई : शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसेच ऑफीसवर ईडीने छापा टाकला होता. यानंतर बोलताना सरनाईक यांनी ‘दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झाला आहे. पण ते तानाजी मालुसरे 16व्या शतकातील होते. हा तानाजी 21व्या शतकातला आहे. ते तानाजी रयतेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले होते. पण हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल’, असे त्यांनी म्हटले होते.

सरनाईक यांनी स्वतःला तानाजींची उपमा दिल्याने भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे, अशा शब्दात राणेंनी सरनाईकांवर निशाणा साधला आहे.

वाचाः राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,83,365 वर

सरनाईक यांचा व्हिडीओ शेअर करत निलेश राणे म्हणाले की, अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे. तानाजी मालुसरेंच्या नखाचीही सर नसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेला प्रताप सरनाईक आता महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची बदनामी करत आहेत. तुलना करणं तर सोडून द्या पण एकही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button