ताज्या घडामोडीपुणे

पश्चिम महाराष्ट्रात 1.18 कोटींच्या अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश

पुणे | पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 1,047 ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे.यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या 756 वीजचोऱ्यांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान या महिन्यात आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागात सुमारे 1 कोटी 18 लाख रुपयांच्या 1,310 ठिकाणी वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध महावितरणची नियमित कारवाई सुरु आहे. ही कारवाई आणखी वेगाने व धडकपणे करण्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये 21 ऑगस्टला वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींचे 5 हजार 956 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा- 574, सातारा- 130, सोलापूर- 107, कोल्हापूर- 116 व सांगली जिल्ह्यात -120 असा एकूण 1,047 ठिकाणी अनधिकृतपणे वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले.

उघडकीस आलेल्या वीजचोऱ्या विशेषतः सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषिग्राहकांकडील आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभागात या महिन्यात आतापर्यंत 1,310 ठिकाणी 1 कोटी 18 लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button