breaking-newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडी

प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायनचा 13 वर्षीय मुलीसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

वॉशिंग्टन | अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबी ब्रायन आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीचा कॅलेफॉर्नियात एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ब्रायन रविवारी आपल्या खासगी हेलिकॉप्टरने जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगी गियाना आणि इतर सात जण सोबत होते. पोलिसांच्या मते, कैलाबसासमध्ये ब्रायन यांचे हेलिकॉप्टर संतुलन बिघडल्याने खाली कोसळून स्फोट झाला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला.

कोबी ब्रायनने आपल्या कारकिर्दीची 20 वर्षे लॉस एंजेलिस लेकर्स संघासोबत घालवले. या दरम्यान त्याने आपल्या संघाला 5 वेळेस विजेता बनवले होते. तो स्वत: 2008 मध्ये एनबीएचा सर्वाधिक मूल्यवान प्लेअर (एमव्हीपी) राहिला होता. याशिवाय दोनदा अंतिम फेरीत एमव्हीपीसाठी निवड झाली होती. ब्रायनने ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या संघाला दोन वेळा चॅम्पियन बनवले. ब्रायनने एप्रिल 2016 मध्ये व्यावसायिक कारकीर्दीतून निवृत्ती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button