TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची यशस्वी सभा

नाशिक: उद्धव ठाकरेंकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर पहिलीच सभा होती मात्र त्या सभेत शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात विराट सभा घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरीतील खेड मधील गोळीबार मैदानावर सभेला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होतीखेडची सभा गाजवल्यानंतर उद्धव ठाकरेंचे लक्ष आता एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आणखी एका नेत्याच्या मतदारसंघावर आहे. येत्या २६ मार्चला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यामुळे मंत्री दादा भुसे यांचा अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मालेगावातील सभेची तयारी सुरु
मालेगावातील अद्वय हिरे यांनी नुकताच भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अद्वय हिरे यांनी तयारी देखील सुरू केली आहे. येत्या २६ मार्चला मालेगावातील मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सभेच्या तयारीला अद्वय हिरे यांनी सुरुवात केली आहे. सभेच्या प्रचाराची आणि जनजागृतीची सुरुवात देखील करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत नेस्को सेंटरला सभा घेतली होती, त्यानंतर त्यांनी दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. बुलढाणा जिल्ह्यात देखील उद्धव ठाकरेंची एक सभा पार पडली. ५ मार्चला रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यास उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वीपणे झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस मधून संजय कदम यांनी सेनेत प्रवेश केला. खेडची सभा यशस्वी झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे पुढील सभा उत्तर महाराष्ट्रात घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या दादा भुसे यांच्या होम ग्राउंड वर सभा घेत उद्धव ठाकरे आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button