Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘या’ वरिष्ठ नेत्याच्या मतदारसंघातच ड्राय रनसाठी चक्क सायकलवरून पोहचवली लस

सरकारने दोन कोरोना प्रतिंबधक लसींना परवानगी दिली आहे. या लसींचे विशेष नियोजन केले जात आहे. यासाठी देशभरातील अनेक सेंटरवर लसीकरण प्रक्रिया सुरू होण्याआधी ड्राय रन घेण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या नियोजनाचा काहीच फायदा झाला नसल्याचे दिसून आले आहे.

पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील चौकाघाट कोरोना लसीकरण केंद्र असणाऱ्या महिला रुग्णालयात चक्क सायकलवरुन लस पोहचवण्यात आली. विशेष म्हणजे ही लस रुग्णालयात पोहचली तेव्हा तेथेही कोणतीच तयारी करण्यात आली नसल्याचे दिसून आले.

याबाबत  वाराणसीचे मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ. व्ही. बी. सिंह यांनी सांगितले की, 5 केंद्रावर व्हॅनने लस पोहचवण्यात आली, तर केवळ महिला रुग्णालयामध्ये सायकल कॅरियरच्या माध्यमातून लस पोहचवण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button