breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे : देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दसरा मेळाव्यानिमित्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव टाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार भाषण केलं. दोन्ही ठिकाणी लाखोंची गर्दी जमली होती. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टोला लगावला आहे. सुज्ञ माणसं शिमग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. तसंच, उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, अशी टीका देवेंद्र फडणवीस उद्धव ठकराेंच्यावर भाषणावर केली आहे.

ठाकरेंचा हल्लाबोल
मी दोन्ही भाषणं ऐकली नाहीत. कारण, मी धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यानंतर, दोन्ही भाषणाचा थोडा थोडा सारांश मी ऐकला. युट्यबूवर एकनाथ शिंदेंचं भाषण बघितलं. मी एवढंच सांगू शकेल, मी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही, कारण शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला अधिक गर्दी होती. त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे हे सिद्ध झालंय. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. परंतु, उद्धव ठाकरेंनी स्क्रीप्ट रायटर बदलला पाहिजे, दरवेळी तेच ते तेच ते.. एकतर स्क्रीप्ट रायटर बदला किंवा स्क्रीप्ट रायटरला क्रिएटीव्ह लिखाण करायला लावा, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला. येत्या विधानसभा निवडणुकीवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या युतीचा भगवा फडकणारच, असंही फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

होय, तुम्ही गद्दारच
डॉक्टरांनी मला सांगितलं आहे वाकायचं नाही. पण, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. प्रत्येक वेळेला संकटावेळी संरक्षक कवच मी अनुभवतोय. आई भवानीच्या आशीर्वादाचं जीवंत संरक्षक कवच तुम्ही आहात. शिवसेनेमध्ये गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रिपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. शिवतीर्थ बघितल्यावर गद्दारांना कळेला. येथे एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. माता भगिनींना विचारा गावारून पायी चालत आले आहेत. तिकडे एक एकटाचा आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button