breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणी थडीच्या निमित्ताने भोसरीतील पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल

भोसरी | महाईन्यूज

  • वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या, आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

इंद्रायणी थडीच्या निमित्ताने भोसरीतील पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलांचा वापर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करावा असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे वाहतूक पोलिसांना व स्वयंसेवकांना सहकार्य करावे. जत्रेचा आनंद लुटताना परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या असेही आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नाशिकफाटा येथून मोशी कडे जातात उड्डाणपुला खाली टू-व्हिलरसाठी भोसरी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत तर फोर व्हिलरसाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये व भोसरी स्मशानभुमि समोर पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मोशी कडून नाशिक फाट्याच्या दिशेने जाताना भोसरी उड्डाणपुलाच्या सुरूवातीला हॉटेल सदगुरूच्या मागे, पेट्रोल पंपा शेजारील जागेवर तसेच उड्डाणपुला खाली टू-व्हिलरसाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते भोसरी चौक येथे गाड्यांची सोय करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, संत तुकाराम मंगल कार्यालय, इंद्रायणी मंगल कार्यालय, कृष्णा-इंदुम्बन मंगल कार्यालय या सर्व मंगल कार्यालयांचे पार्किंग नागरिकांना उपलब्ध आहे.

वाहतुक पोलिसांनी जाहिर केलेले नो पार्किंग झोन

भोसरी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह रस्त्याच्या दोन्ही बाजूस तसेच उड्डाणपुलाखाली टू-व्हिलर सोडून इतर वाहने (कार,खाजगी बस,ट्रक टेम्पो,हतागाडी) लावण्यास परवानगी नाही.

● कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते भोसरी हॉस्पिटल रस्त्याच्या दोन्ही बाजूस कोणत्याही प्रकारची वाहने लावण्यास परवानगी नाही.

● इंद्रायणी थडी गावजत्रा मैदाना समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूस कोणत्याही प्रकारची वाहने
लावण्यास परवानगी नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button