breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘…तर मी पुन्हा येईन’; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखवली इच्छा

अहमदनगर |

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचे या भागात दौरेही वाढले आहेत. संगमनेर तालुक्यातील एका गावात कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली. पूर्वी एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Loksabha Constituency) जरी निवडणूक हरलो असलो तरीही आपण बोलावत असाल तर नक्की पुन्हा परत येण्याचा विचार करीन, असे आठवले म्हणाले. (Ramdas Athawale wants to contest from Shirdi Lok Sabha constituency)

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भोजदरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आठवले आले होते. या भागात आठवले प्रथमच आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांनी या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, तुम्ही म्हणत असाल तर मी नक्की विचार करीन. तशीही माझी राज्यसभा सदस्यात्वाची मुदत २०२२ पर्यंतच आहे,’ असे सांगून त्यांनी या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.

  • ‘राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे जमत नाही, तरी…’

केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी काम करत आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी मी आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे जमत नाही. जरी जमत नसले तरी तुमच्या कामासाठी जमवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. विकास कामात राजकारण येता कामा नये.’

‘देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी अजूनही रस्ते होत नाहीत. गावा-गावाला जोडणारे रस्ते झाले पाहिजे. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री या सडक योजना आहेत. डोंगरी भागामध्ये रस्ते करण्यासाठी वेगळा निधी आहे. या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी मी नक्की आपल्याला सहकार्य करेल. भारत सरकारच्या ज्या काही योजना देता आल्या तर त्या देण्याचा प्रयत्न करू. राज्य सरकारच्या वतीने आपल्याला काही मदत करता येईल ती आपण करू. तुमच्या भागातील रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नक्की राज्य सरकारला पत्र लिहून त्याचा पाठपुरावा करीन, असे आश्वासनही त्यांनी गावकऱ्यांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button