breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ तालुक्याचे माजी आमदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेडगे यांचे निधन

पिंपरी: मावळ तालुक्याचे माजी आमदार,दिगंबर भेगडे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडलेले आदर्श लोकप्रतिनिधी,आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

दरम्यान, मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भेगडे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

दिगंबर भेगडे यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दिगंबर भेगडे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता कुंडमळा, शेलारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिगंबर भेगडे हे मावळातून भाजपच्या तिकिटावर दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. मावळ पंचायत समितीचे ते माजी उपसभापती होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button