breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

हल्ला करण्यासाठी सक्षम असलेले सशस्त्र ड्रोन चीन पाकिस्तानला देणार

बीजिंग | एकीकडे जग कोरोनाविरोधात लढत असताना दुसरीकडे सीमेवर पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने हात मिळवणी केली असून चीनने आता पाकिस्तानला चार सशस्त्र ड्रोन विमाने देण्याचा निर्णय घेतला आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर आणि ग्वादर बंदरावरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदालाच्या नवीन तळाच्या संरक्षणासाठी चीन पाकिस्तानला ही ड्रोन विमाने देणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

चीनचा अतिमहत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला बॉर्डर अँण्ड रोड प्रकल्प बलुचिस्तानच्या ग्वादर भागात सुरू आहे. मात्र या प्रकल्पामुळे ग्वादर भागार प्रचंड अशांतता निर्माण झाली आहे. चीनने या बीआरआय प्रकल्पामध्ये तब्बल सहा कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीन पाकिस्तानला ग्राऊंड स्टेशनसह चार ड्रोन विमाने देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे चारही ड्रोन्स हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत.

सशस्त्र ड्रोन्स विकणारा चीन एक मोठा निर्यातदार देश आहे. आशिया आणि पश्चिम आशियातील अनेक देशांना चीनने विंग लूंग २ ड्रोन्सची विक्री आधीपासूनच सुरु केली आहे. टेहाळणी बरोबरच हल्ला करण्यासही ही ड्रोन्स सक्षम आहेत. त्यामुळेच, चीनची पाकिस्तानसोबत मिळून ४८ GJ-2 ड्रोन्स बनवण्याची योजना आहे. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार, कझाकस्तान, तुर्केमेनिस्तान, अल्जेरिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना चीनने २००८ पासून २०१८ पर्यंत १६३ यूएव्हीची विक्री केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button