breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मावळात धडाडणार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची तोफ!

मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा

पिंपरी | मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा बुधवारी (दि. 8) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची तोफ धडाडणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरु असून महाविकास आघाडीच्या या महासभेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरून, बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असणारे उमदे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार (दि. 8) सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी. पी. आय. (एम),आर. पी. आय. (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत.

हेही वाचा      –      ‘पिंपरी चिंचवडमधील सोसायट्यांची पाणीटंचाई सप्टेंबरपर्यंत संपेल’; खासदार श्रीरंग बारणे 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख तथा आमदार सचिनभाऊ अहिर, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे हे प्रमुख वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. वयाची ऐंशी उलटून देखील संघर्ष योद्धा आधारवड शरद पवार साहेब हे अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत. जयंत पाटील यांचे आक्रमक भाषण नेहमीच विरोधकांच्या उरात धडकी भरवत असते. पृथ्वीराज चव्हाण यांचे अनुभवी प्रगल्भ आणि मुद्देसूद भाषणाला विरोधकांकडून एक टक्का देखील प्रत्युत्तर मिळत नाही. संजय सिंह आणि चंद्रकांत हांडोरे यांची सडेतोड भाषणे यावेळी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना देखील महाविकास आघाडीच्या धडाडणाऱ्या तोफांचे आवाज ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तमाम नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button