breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

रशियात पुन्हा पुतिनराज! पुतिन यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

Vladimir Putin | व्लादिमीर पुतिन यांनी ७ मे रोजी सलग पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली आहे. पुतिन यांना रशियात झालेल्या निवडणुकीत ८७ टक्के मतदान झालं आहे. आजपासून त्यांनी आपल्या पाचव्या टप्प्याच्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे. पुढील सहा वर्षांसाठी ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर असतील.

मॉस्कोच्या ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये पुतिन यांनी 33 शब्दांची शपथ घेतली. येथेच रशियाच्या झार यांच्या तीन राजांचा राज्यभिषेक झाला होता. पुतिन यांनी २००० साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. यानंतर २००४,२०१२, २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. १९९९ पासून पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ सांभाळत आहेत.

हेही वाचा    –    मावळात धडाडणार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची तोफ! 

राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पुतिन आपल्या भाषणात म्हणाले, पश्चिमेकडील देशांशी बातचीत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यांना आमच्याशी संवाद साधायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. पश्चिमेकडील देशांनी सातत्याने रशियातील विकास रोखण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे ते आमच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. युरोप आणि आशियातील सहकारी देशांसोबत मिळून आम्ही मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरसाठी काम करीत राहू. सर्व देशांकडे एकसारखी सुरक्षा व्यवस्था असावी अशी आमची इच्छा आहे, असं पुतिन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button