breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून पोलिस बांधवाना लसीकरण करा

  • नगरसेवक तुषार हिंगे यांचे आयुक्त राजेश पाटील यांना पत्र

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस बांधव आणि कुटूंबियाना फ्रंटलाइन वर्कर म्हणून तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी नगरसेवक तुषार हिंगे यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.

त्या पत्रात म्हटले आहे की, देशभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेकांना या संकटाचा सामना करावा लागला आहे. अत्यावश्यक सेवेत काम करताना पोलिस कर्मचा-यांना देखील त्याचा फटका बसला आहे. सध्यस्थितीत पोलिस बांधव दिवस-रात्र बंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यांच्या परिवाराची काळजी घेणं गरजेचे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह आयुक्तालयातील सर्व पोलिस बांधवासह त्यांच्या कुटूंबियाचे तातडीने लसीकरण करण्यात यावे. जेणेकरुन कोरोना परस्थितीत पोलिस बांधवाना अधिक बळ येईल. तसेच त्याचे कुटूंबिय देखील सुरक्षित राहिल. याविषयी महापालिका आयुक्त म्हणून आपण तत्काळ लक्ष घालून प्रशासनास तशा आदेश द्यावा, असेही हिंगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button