breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘हाळबीची शेंडी’वरुन पडून दोन गिर्यारोहकांचा मृत्यू; काहींनी दोघांना पडताना पाहिलं अन्…

नाशिक |

नाशिक जिल्ह्यामधील मनमाड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळबीची शेंडी या डोंगरावरून उतरताना दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये एक जण जखमी झालाय. या गटामधील अन्य १२ गिर्यारोहक सुखरुप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व गिर्यारोहक अहमदनगर येथील इंद्रप्रस्त टेकर्स ग्रुपचे आहेत. बुधवारी सायंकाळी ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडल्याची माहिती समोर आलीय. अंधारामुळे मदत कार्यात मोठा अडथळा आल्याने सर्व गिर्यारोहकांची रात्री उशीरा सुटका करण्यात आली. अहमदनगर येथील इंद्रप्रस्त टेकर्स ग्रुपच्या आठ मुली आणि सात मुले अशी पंधरा जणांची टीम बुधवारी सायंकाळी ट्रेनसाठी मनमाड नजीक असलेल्या हडबीची शेंडी अर्थात अंगठा डोंगरावर येथे आले होते.

अंगठ्याच्या आकाराच्या सुळक्यावर त्यांनी यशस्वी चढाई केली. त्यासाठी त्यांनी खिळ्यांच्या सहाय्याने रोप बांधला होता. यशस्वी चढाईनंतर हे सर्व टेकर्स खाली उतरत होते. दोन शेटवचे ट्रेकर म्हणून मस्के आणि अमोल वाघ हे सर्वात शेवटी होते. रोप वरून खाली येत असताना या रोपेचे खिळे काढताना हे दोघेही व प्रशांत पवार हे खाली पडले. या घटनेमुळे या तिघांसोबत आलेल्या सर्व ट्रेकर्समध्ये एकच खळबळ उडाली आणि ते घाबरून गेले. जखमी ट्रेकर्ससहीत सर्वांनाच डोंगरावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला तेथील ग्रामस्थांच्या मदतीने करण्यात आला.

ग्रामस्थही रात्रीच्या वेळी मदतीला धावून आले आणि त्यांनी या ट्रेकर्सला आधार दिला. रात्री उशिरा व जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मरण पावलेले दोघे ट्रेकर्स या डोंगरावरुन खाली पडत असताना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी बघितले आणि त्यांनी तात्काळ फोन स्थानिक रापली व कातरवाडी येथील तरुणांना बोलावून घेतले. अपघात झाल्याचे लक्षात येताच या गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने या जखमी तरुणांना डोंगराच्या पायथ्याशी आणलं. नंतर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी ट्रेकर्सला बघण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी या गावामधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button